तुळजापूर (प्रतिनिधी)-  छञपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेल्या शिववरदानी  श्रीतुळजाभवानी मंदीरात बुधवार दि. 19 फेब्रुवारी रोजी देविजींचा सिंहासनावर भवानी तलवार अलंकार महापुजा मांडण्यात येणार आहे. तसेच चांदीचा मेघडंबरीत छञपती शिवाजी महाराज मुर्ती प्रतिष्ठापना श्रीतुळजाभवानी मंदीरातील श्रीगणेश ओवरीत केली जाणार आहे.

यंदा तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह तालुक्यात शिवजयंती निमित्ताने रायगडवरुन भवानी ज्योत आणुन शिवमुर्ति प्रतिष्ठापना केली जाणार आहे.  तसेच रक्तदान अन्नदान आरोग्य शिबीर सिमेंट बेंच भेट  विविध स्पर्धा वृक्षारोपन  सह अनेक समाजपयोगी उपक्रम आयोजीत केले आहेत. तसेच शहरात सार्वजनिक शिवजयंती सोहळा समिती वतीने भव्य मंडप उभारणी केली आहे. छञपती शिवाजी महाराज अश्वरुढ पुतळा स्वच्छ धुवुन घेण्यात आला आहे. घरावर सर्वञ भगवे  झेंडे लावल्याने शहर भगवेमय झाले आहे.


भाविकांना बसण्यासाठी बेंच भेट 

शिवजयंती  औचित्य साधुन विनोद गंगणे विशाल रोचकरी  यांच्या संकल्पनेतुन रणसम्राट मंडळाचे अध्यक्ष यांच्या वतीने मंदीर महाध्दार परिसरातील भाविकांना बसण्यासाठी बेंच भेट देण्यात आल्रे. याचे उदघाटन माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते सुहास गायकवाड, शांताराम पेंदे, संदीप गंगणे, धर्यशिल दरेकर यांच्या उपस्थितीत छञपती शिवाजी महाराज प्रतिमा पुजन करुन  भेट देण्यात आले.


 
Top