धाराशिव (प्रतिनिधी) - येथील नूतन प्राथमिक विद्यामंदिर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त वेशभूषा व भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते वेशभूषा स्पर्धेत इयत्ता पहिली व दुसरीच्या 78 विद्यार्थ्यांनी तर भाषण स्पर्धेत इयत्ता तिसरी व चौथीच्या 124 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेतील सर्व यशस्वी विजेत्या विद्यार्थ्यांना लातूर येथील शिक्षण विभागातील अधिकारी दत्ता थिटे , श्रीपतराव भोसले हायस्कूलचे पर्यवेक्षक अमोल देशमुख , प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे या मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले विद्यार्थ्यांच्या अंगी लहानपणापासूनच शिवरायांची व जिजाऊंची संस्काराची शिकवण रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी दत्ता थिटे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय जाधव, श्रीमती तृप्ती तिकोने, श्रीमती यमुना जाधवर, श्रीमती दिपाली सुरवसे, अनुज जाधव यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज खोबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सोमनाथ शेळके यांनी केले.