तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ तुळजापूर येथे तीनशे बेडचे उभारण्यात येणारे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे ठाणे नंतर राज्यात फक्त तिर्थक्षेञ तुळजापूर येथे उभारले जाणार आहे. येथे मोफत सोळाशे रोगांवर पारदर्शक पध्दतीने उपचार करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. श्रीतुळजाभवानी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय जेथे कार्यान्वित केले जाणार आहे त्या नगरपरीषद मालकिच्या 124 भक्तनिवास पाहणी नंतर पञकारांशी बोलताना दिली.
यावेळी बोलताना सरनाईक पुढे म्हणाले कि, या रुग्णालयात राजकिय हस्तक्षेप असणार नाही ठाणे भागात असे तीन रुग्णालय चालु आहेत. त्यात विद्यमान उपमुखमंञी एकनाथ शिंदे यांच्या नावानेचे आहे. नगरपरीषद, राज्य शासन संयुक्त विद्यमानाने हे चँरीटेबल चालवले जाणार आहे. या रुग्णालय उभारणी पैसा मंदीर ट्रस्ट देणार आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर येथे सुरु होणाऱ्या हॉस्पीटलचे नाव श्रीतुळजाभवानी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल असणार आहे. हे नगर परीषद व राज्य सरकारचे महात्मा फुले जनआरोग्य योजना व आरोग्यमंञी अध्यक्षतेखाली खाली ज्या समिती आहेत त्या सलग्न हे रुग्णालय कार्यरत केले जाणार आहेत. येथे सोळाशे रोगांवर उपचार मोफत केले जाणार आहे. येथे महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत पाच लाखा पर्यत मोफत उपचार केले जाणार आहेत. या रुग्णालयात राजकिय हस्तक्षेप असणार नाही. या रुग्णालयाचा कारभार पारदर्शक असणार असुन काय आजार झाला, काय उपचार केले याची सविस्तर माहीती येथे दिली. रुग्णांना येथे नियमानुसार प्रवेश दिला जाणार, तो रुग्ण भारत तसेच महाराष्ट्राचाच असावा ही अट असणार आहे. अशी माहिती पालकमंत्री सरनाईक यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, मुख्याधिकारी लक्षमण कुंभार सह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थिती होते.