तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील शेकापचे माजी नगराध्यक्ष कै.प्रकाशराव गुणवंतराव देशमुख 91 यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी दिनांक 21 रोजी सकाळी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंड असा परिवार आहे. ते शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. तीन वेळा त्यांनी नगराध्यक्ष पद भूषविले होते. त्यांच्यावर सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस राजकीय मंडळी व्यापारी मंडळी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.