तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ रविवार सुट्टी पार्श्वभूमीवर तिर्थक्षेञ तुळजापूरात देविदर्शनार्थ भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती.
रविवार पहाटे एक वाजल्या पासुन भाविक मंदीरात दर्शनार्थ दाखल होत होते. सकाळी पासुन भाविकांचा ओघ सुरु झाला तो सांयकाळ पर्यत होता. प्रचंड गर्दी पार्श्वभूमीवर काही भाविकांनी रांगेत न थांबता प्रदक्षिणा मारुन शिखर दर्शन घेऊन दर्शन झाल्याचे मानून समाधानाने गावी परतले. आज बाजार पेठ, वाहन तळे, मंदीराकडे येणारे रस्ते भाविकांनी गजबजुन गेले होते.