धाराशिव (प्रतिनिधी) -शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि  महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 10 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाची सुरुवात रविवार, दि. 10 जानेवारी रोजी सकाळी भव्य ग्रंथ दिंडीने करण्यात आली.

ग्रंथ दिंडीचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष आसाराम लोमटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे, प्राचार्य अनिल काळे, सौ. अनुराधाताई  काळे, सौ. शुभांगीताई काळे, प्राचार्य मधुकरराव कुंभार, प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, प्रा. अंकुश नाडे, गंगाधर आरडले, बालाजी तांबे, राजकुमार मेढेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रंथदिंडीत विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्ती व महापुरुषांच्या वेशभूषा करून सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या वेशभूषेने सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पळसप गावातील प्रमुख मार्गावरून ही दिंडी संमेलन स्थळी पोहचली. दिंडीत ज्ञानविकास प्राथमिक विद्यामंदिर पळसप, जि .प. प्राथमिक  विद्यामंदिर पळसप, जि.प. हायस्कुल पळसप, वसंतराव काळे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय ढोकी, राजर्षी शाहू विद्यालय गौर ता. कळंब, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय शिरढोण, लोकनायक विद्यालय नायगाव, जिजामाता प्राथमिक विद्यालय लातूर, जिजामाता माध्यमिक विद्यालय लातूर यासह धाराशिव व लातूर जिल्ह्यातील शाळेचे विद्यार्थी, किसान परिवाराचे सदस्य, मराठवाड्यातून आलेले साहित्यिक आणि पळसप व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top