धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड अरविंद नगर केशेगाव एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे महाराष्ट्र राज्य साखर संघ मुंबई आणि आकाशवाणी केंद्र धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या कारखाना सहकारी क्षेत्रात अडीचशे शेतकऱ्यांच्या शेतावर सोईल मोस्चर व हवामान केंद्र उभारणी केली असून, ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करावयाचे शेतकऱ्यांना दाखवण्यात आले चालू असलेल्या मोबाईल ॲप वरती पाठवलेली माहिती कशी पहायची व त्यावर आलेल्या अडीअडचणीचे चर्चासत्र घेण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक किशोर पवार कार्यक्रम प्रसारण अधिकारी आकाशवाणी केंद्र धाराशिव यांनी केले. कार्यक्रमाच्याद्देश पर प्रस्तावना ॲड. चित्राव गोरे चेअरमन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट यांनी केले. उद्घाटन पर मनोगत निवासी उपजिल्हाधिकारी श्रीचरण कडावकर याने करून आपल्या जिल्ह्यामध्ये हा प्रयोग कारखान्याच्या वतीने पुढाकार घेऊन राबविल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष तसेच सर्व संचालक मंडळाचे कौतुक केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी नेहमीच या कारखान्याने आधुनिकतेचा वारसा पुढे चालवल्याबद्दल विशेष कौतुक केले. अध्यक्ष मनोगत मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मा. अरविंद दादा गोरे साहेब यांनी कारखान्याने अडीअडचणीवर मात करून काटकसर करून कारखाना ज्या पद्धतीने चालवला त्याच पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकऱ्याने आपले एकरी उत्पादन वाढविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. प्रमुख मार्गदर्शन वैज्ञानिक अधिकारी व्ही. एस. आय. पुणे माननीय श्री. डॉक्टर समाधान सुरवसे तसेच प्रकल्प समन्वयक कृत्रिम बुद्धिमत्ता अग्रिकल्चर ट्रस्ट बारामती मा. श्री.तुषार जाधव साहेब यांनी चांगल्या पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्या शेतामध्ये जाऊन स्वतः चेअरमन यांनी केलेल्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रात हा कारखाना सहकार क्षेत्रातला एकमेव सहकारी साखर कारखाना ठरल्याचे आवर्जून गौरव उद्गार काढले.
आभार प्रदर्शना मध्ये संचालक ॲड. निलेश बारखडे पाटील यांनी देशांमध्ये सहकार क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने एक मेगावॅट सोलर प्रकल्प राबवला आणि नावलौकिक मिळविला त्याच पद्धतीने आता महाराष्ट्रात एक नंबर ला सहकारी क्षेत्रात अडीचशे शेतकऱ्यांच्या शेतावर ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प राबवून नावलौकिक मिळविला आहे. यामध्ये शेतकऱ्याचे मोठे योगदान असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमात सर्व संचालक मंडळ, ऊस उत्पादक सभासद, हितचिंतक उपस्थित होते. तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक, शेतकी अधिकारी, त्यांचा सर्व स्टाफ महिला कर्मचारी शेतकी मदतनीस उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष लगाडे आकाशवाणी केंद्र धाराशिव यांनी केले. शेवटीअल्पो आहार चहापाणी झाले तसेच शेतकऱ्याला येणाऱ्या अडीअडचणीवर प्रश्नावर चर्चासत्र झाले आणि कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वीपणे होण्यासाठी सर्वांचे सहकार्या लाभल्याबद्दल कारखान्याच्या वतीने संचालक ॲड. निलेश बारखडे पाटील यांनी आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातला पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेचा ऊस शेतीमध्ये वापर करणारा आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना ठरला.
