परंडा - क्रांतीसंगर बहुउद्दशिय  शैक्षणिक  संस्था संचलित,  क्रांती करिअर अकॅडमी परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य खुल्या रनिंग व लेखी  स्पर्धेचे  आयोजन केले होते.या स्पर्धेला विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून (पै.) नवनाथ आप्पा जगताप यांनी मार्गदर्शन केले परंडा सारख्या मागास भागामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे अशा स्पर्धेतूनच विद्यार्थी घडत असतात हे अनमोल  कार्य परंडा तालुक्यामध्ये क्रांती अकॅडमीचे संचालक प्रा. पांडुरंग कोकणे  व फिजिकल ट्रेनर दीपक ओव्हाळ सर करतात. असे प्रमुख पाहुणे यांनी म्हटले आहे.

 या कार्यक्रमाचे प्रस्ताविक क्रांती अकॅडमीचे संचालक पांडुरंग कोकणे सर यांनी या चालू वर्षात अकॅडमीचे 23 विद्यार्थी पोलीस, तीन विद्यार्थी PSI, प्रत्येकी एक विद्यार्थी ग्रामसेवक ,तलाठी ,मुंबई कोर्ट मध्ये तसेच  अग्नीवर मध्ये 5  विद्यार्थी भरती झाले, म्हणजे क्रांती अकॅडमीचे एका वर्षात 34 विद्यार्थीची वेगवेगळ्या क्षेत्रात निवड झाली, तसेच या कार्यक्रमाला आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संभाजी पाटील, तुकाराम चव्हाण, महादेव कोकणे सरपंच देवगाव (खुर्द,)नागनाथ कोकणे सर ,बालाजी कांबळे ,सोमनाथ देवकर सर, शरद तांबे सर ,कोकाटे सर, कृष्ण साळुंखे सर, वैभव जाधव सर ,बालाजी डोरले ,सचिन पाटील सर, महेश शिंदे ,महादेव भोरे ,पंकज रणदिवे, सय्यद  पोलीस कॉन्स्टेबल, हान्नुरे मॅडम, सुहास चव्हाण आदींची उपस्थिती होती.

या स्पर्धेमध्ये भूम ,परंडा, करमाळा ,बार्शी, वैराग , कुर्डुवाडी ,वाशी ,सोलापूर धाराशिव ,तुळजापूर या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला होता ,

या स्पर्धेत खालील विद्यार्थ्यांचा क्रमांक आला.

800 मीटर धावणे -(मुली ) प्रथम क्रमांक -अनुराधा काटवटे (क्रांती अकॅडमी ) द्वितीय क्रमांक - रूपाली इंदुरकर (थ्री एस अकॅडमी)  तृतीय क्रमांक - सिमरम पटेल ( थ्री एस अकॅडमी ) १६०० मीटर धावणे (मुले)

 प्रथम क्रमांक - किरण अनपट (बार्शी अकॅडमी) 

 द्वितीय क्रमांक - ज्ञानेश्वर लकडे( थ्री एस अकॅडमी)

 तृतीय क्रमांक - ओम कांबळे (थ्री एस अकॅडमी)

उत्तेजनार्थ -हमराज काळे (क्रांती अकॅडमी,)

 उत्तेजनार्थ - यश ढगे (क्रांती अकॅडमी) लहान गट धावणे प्रथम क्रमांक- श्रवण चव्हाण (बार्शी )

द्वितीय क्रमांक- परवेज मौला पठाण (बावची विद्यालय परांडा) तृतीय क्रमांक- श्रीराज अंबादास शिंदे (R.M. स्पोर्ट अकॅडमी gb परंडा )

या कार्यक्रमाचे  फिजिकल ट्रेनर दीपक ओव्हाळ सर यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन अश्विनी गोडगे व श्वेता गटकूळ यांनी केले.


 
Top