धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत 'साहित्य भारती' च्या वतीने जिल्हास्तरीय 'मराठी कथालेखन' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती साहित्य भारतीचे धाराशिव जिल्हा समन्वयक श्री युवराज नळे यांनी दिली आहे. चार गटांत ही स्पर्धा होत आहे.

आजच्या वर्तमानात कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व, गरज  व बलस्थाने, परंपरेचे महत्व या अनुषंगाने कथा अपेक्षित आहे. कुटुंब व्यवस्थेचे स्थान अबाधित राहावे, यासाठी शालेय, महाविद्यालयीन युवकांसह प्रौढ व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक अशा गटांसाठी कथालेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  इयत्ता ९ ते १२ वी,  पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालयीन युवक,  वय वर्ष चाळीसपर्यंत व  वय वर्ष चाळीसपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक अशा चार गटांत ही कथा स्पर्धा होणार असून  २ हजार शब्दांपेक्षा जास्त नसलेली कथा, कथेच्या प्रारंभी लेखकाचे संपूर्ण नाव, गाव, पत्ता, मोबाइल क्रमांक लिहून आपली कथा  sahityabharti.devgiri@gmail.com या मेलवर युनिकोडमध्येच दि. ७ फेब्रुवारी पर्यंत पाठवावी, असे आवाहन देवगिरी प्रांत अध्यक्ष दत्ता जोशी, प्रकल्प समन्वयक डॉ. नागेश अंकुश, दीपाली कुलकर्णी व धाराशिव जिल्हा समन्वयक युवराज नळे यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील विजेत्या स्पर्धकांना  सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती साहित्य भारती तर्फे करण्यात आले आहे.

 
Top