तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ तुळजापूरात श्री गणेश जन्मोत्सव सोहळा निमित्ताने राजा कंपनी व श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती मंदिर सेवा समिती तर्फ श्री गणेश जन्मोत्सव सोहळा निमित्ताने सकाळी महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर अंलकार पुजा घालण्यात आले. नंतर अथर्वशीर्ष पठण प्रारंभ होवुन सकाळी 09 वाजता श्री च्या पावन पादुकांची नगर प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. दुपारी 12 वाजता महाआरती व महाप्रसाद ने कार्यक्रम संपन्न झाला. राञी 9 वाजता किर्तनाने या सोहळ्याचा सांगता झाली.