भूम (प्रतिनिधी)- विद्या विकास मंडळ पाथरूड संचलित भूम येथील शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असणारे प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण चंदनशिव यांचा सेवापूर्ती समारंभ आज दिनांक 31/01/2025 रोजी साजरा करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे सदस्य प्राचार्य डॉ. एस. एन. सिंह सर यांनी केले. अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळ पाथरुड संस्थेचे अध्यक्ष डॉ. उद्धव निवृत्ती बोराडे हे होते. आमदार विक्रम काळे शिक्षक आमदार मराठवाडा विभाग यांच्या शुभहस्ते सेवापूर्ती निमित्त प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण चंदनशिव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
विद्या विकास मंडळ पाथरुड संस्थेच्या वतीने, तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर प्रोफेसर डॉ. वाल्मीक सरवदे प्र. कुलगुरू डॉ.बा. आं. म. वि. छत्रपती संभाजी नगर, माजी प्राचार्य डॉ. एस. एन. सिंह सर एस.पी. महाविद्यालय, भूम, माजी प्राचार्य डॉ. सुर्यकांत जगदाळे के.एम.जे.एम. वाशी, प्रा. नामदेव दुधाळे शि. म. ज्ञा. मोहेकर महाविद्यालय, कळंब, माजी प्राचार्य डॉ. रमेश दापके आर.पी. महाविद्यालय, धाराशिव, डॉ. शिवाजी मदन, अध्यक्ष, विद्यांचल शिक्षण संस्था, जालना तथा माजी व्यवस्थापन सदस्य, डॉ.बा. आं. म. वि. छत्रपती संभाजी नगर, प्रा.डॉ. अंकुश कदम व्यवस्थापन परिषद सदस्य, डॉ.बा. आं.म.वि. छत्रपती संभाजी नगर, प्राचार्य दिलीप गरुड, आदर्श महाविद्यालय, उमरगा, प्राचार्य डॉ. जयसिंग देशमुख, आर.पी. महाविद्यालय, धाराशिव, (सी.ए.) संतोष आमटे, बीड, प्राचार्य डॉ. विधाते सर, मा. अधिष्ठाता तथा मा. व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिसभा सदस्य, डॉ.बा. आं.म.वि. छत्रपती संभाजी नगर, प्राचार्य डॉ. भोर सर, डॉ. रमाकांत घाडगे (माजी व्यवस्थापन परिषद सदस्य, एस. आर.टी. विद्यापीठ, नांदेड), प्रो. डॉ. अशोक मोटे (अधिसभा सदस्य, एस.आर.टी. विद्यापीठ, नांदेड), प्रा. डॉ. आप्पासाहेब हुंबे (माजी व्यवस्थापन परिषद सदस्य, डॉ.बा. आं.म.वि. छत्रपती संभाजी नगर) तसेच संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी श्री. दत्तात्रेय देविदास बोराडे (उपाध्यक्ष, विद्या विकास मंडळ, पाथरूड), श्री. मुरलीधर भाऊराव काटे (सचिव, विद्या विकास मंडळ, पाथरूड), प्राचार्य श्री. संतोष सुखदेव शिंदे (उपसचिव, विद्या विकास मंडळ, पाथरूड), श्री. अतुल तुळशीदास सुरवसे (कोषाध्यक्ष, विद्या विकास मंडळ, पाथरूड), प्राचार्य डॉ. सिंह एस. एन. (सदस्य, विद्या विकास मंडळ, पाथरूड), श्री. उद्धव भाऊराव काटे (सदस्य, विद्या विकास मंडळ, पाथरूड), श्री. उत्तम चाचा बोराडे (पाथरूड) आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्र.कुलगुरू वाल्मीक सरवदे, प्राचार्य संतोष शिंदे, श्री. संतोष आमटे सर, डॉ. शिवाजी मदन, डॉ. सुर्यकांत जगदाळे, प्राचार्य डॉ. रमेश दापके, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड यांनी आपल्या मनोगतातून प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण चंदनशिव यांच्या प्रदीर्घ कार्याचा गौरव केला तसेच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मा.आ. विक्रमजी काळे साहेब (शिक्षक आमदार मराठवाडा विभाग) आपल्या भाषणात प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण चंदनशिव यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण चंदनशिव यांनी आपल्या मायरुपी संस्थेचे, जन्मदात्या आई-वडिलांचे, सर्व आप्तेष्टांचे, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी आप्तेष्ट, पालक, ग्रामस्थ, आजी- माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गंगाधर काळे आणि डॉ. राजश्री तावरे यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ. डी. व्ही. शिंदे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.