तेर (प्रतिनिधी)- विद्यार्थीनीचे धावणे स्पर्धेत यश कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन तेरणा विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष गायकवाड यांनी केले.

धाराशिव तालुक्यातील तेर येथे नरहरी बडवे यांनी अकरावी व बारावीच्या विद्यार्थीनींसाठी शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते.धावणे स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमात संतोष गायकवाड बोलत होते.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के.बेदरे होतें तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक एस.एम.पाटील, तेरच्या सरपंच दिदी काळे, माजी सरपंच सुवर्णा माळी,गिताताई कोळपे, संवाद सहाय्यक जयश्री माळी, लहुजी शक्ती सेनेच्या धाराशिव तालुका महीला आघाडी प्रमुख लतिका पेठे,नसिम मुलांनी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी धावणे स्पर्धेतील प्रथम विजेती सानिया मुलांनी, व्दितीय विजेती मयूरी घोडके, तृतीय विजेती दिक्षा इंगळे या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक नरहरी बडवे यांनी केले तर यावेळी महेश गोडगे,जे.के.बेदरे यांनी आपले विचार व्यक्त केले.सूत्रसंचलन माधवी सरवदे यांनी केले तर आभार जयश्री भक्ते यांनी मानले.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी,विद्यार्थीनी उपस्थित होते.

 
Top