धाराशिव (प्रतिनिधी)- या बैठकीत प्रामुख्याने खालील विषय मांडण्यात आले धाराशिव जिल्हा हा आकांक्षीत जिल्हा असून या जिल्ह्यातील लोक वस्त्या निवडताना 500 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वस्त्या या निकषानुसार पात्र ठरणार असून व सदरील वस्त्याची निवड करताना आकांक्षीत जिल्ह्यातील आकांक्षीत तालुका हा निकष या योजनेत नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर सात तालुक्यातील वस्त्या वंचित राहणार आहेत. त्यामुळे या निकषांमध्ये सुधारणा करुन सर्व तालुक्यांचा अंर्तभाव करावा. 250 लोकसंख्या असलेल्या वस्त्याचा देखील विचार करावा. सदरील वस्त्या बारमाही रस्त्याने जोडाव्या व तसा सविस्तर आराखडा केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवावा अशी महत्त्वपूर्ण सूचना या बैठकीत केली.

 
Top