धाराशिव (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव ऑटो रिक्षा समितीच्यावतीने रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नागरिकांनी फटाक्याची आतषबाजी व फुलांची उधळण करीत उत्साहपूर्वक जल्लोषात दि.18 फेब्रुवारी रोजी स्वागत केले. या ऑटो रिक्षा रॅलीचे हे सलग चौदावे वर्ष आहे.

धाराशिव शहरातील बोंबले हनुमान चौकातून काढण्यात आलेल्या ऑटो रॅलीचे उद्घाटन धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र अंभोरे, ज्ञानेश्वर कुकलारे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, उल्हास उर्फ बुबा उंबरे, मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप इंगळे, अशोक उंबरे व विष्णू इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व शिवरायांची आरती करुन करण्यात आले. यावेळी प्रभाकर निंबाळकर, अमित उंबरे, पांडुरंग लाटे, राजीव ढोबळे, तानाजी माने, अनंत उंबरे सचिन तावडे, अर्जुन पवार, मालोजी सुर्यवंशी, जमाल तांबोळी, बाळासाहेब कुंभार, संतोष तनमोर, रमेश यादव, विशाल भोसले, चंद्रकांत पांढरे, संजय रायबाग, विश्वास ढोबळे, अण्णा सोलापूर, अजय डोंगरे, पी एन आंबेकर, व्ही बी तेरकर, माणिक इंगळे आदीसह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅलीमध्ये रिक्षावर चौफळा तयार करून त्यावर अतिशय आकर्षक छत्रपती शिवरायांची मेघडंबरी मूर्ती बसविण्यात आली होती. या रॅलीचे रस्त्यावर ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी व फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये प्रचंड जल्लोषात स्वागत केले. या रॅलीमधील सहभागी नागरिकांनी जय भवानी, जय शिवाजी....छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो... छत्रपती शिवाजी महाराज... राजमाता जिजाऊंचा विजय असो.... तुमचं आमचं नातं काय, जय भवानी जय शिवराय...आदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. प्रत्येक रिक्षाच्या समोरील दोन्ही बाजूस लावलेले भगवे ध्वज व एका लाईनमध्ये एका मागोमाग येत असलेले रिक्षे या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. ही रॅली बोंबले हनुमान चौकातून देवी मंदिर, गवळीवाडा, बार्शी नाका जिजाऊ चौक, माणिक चौक, सह्याद्री कॉर्नर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक, पोलीस मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक, देशपांडे स्टँड, नेहरू चौक, काळा मारुती चौक, पोस्ट ऑफिस कार्यालय चौक, त्रिसरण चौक, अंबाला हॉटेल चौक लेडीज क्लब मार्गे बार्शी नाका-जिजाऊ चौकात या रॅलीचे विसर्जन करण्यात आले. या रॅलीमध्ये रिक्षा सहभागी झाले होते.

 
Top