धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील सर्व्हे नं. 153 मधून बँक कॉलनी व अन्य नागरी भागांना जोडणारा रस्ता संदर्भात नागरीकांच्या मागणीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये सदर रस्ता पुर्वीप्रमाणे चालू ठेवणेसंदर्भात पोलीस अधिक्षक धाराशिव मुख्याधिकारी, नगर पालीका, धाराशिव, जिल्हा प्रशासन अधिकारी नगर रचनाकार यांच्या समवेत नागरीकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीस आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर उपस्थीत होते.
पोलीस प्रशासनाच्या ताब्यातील जमीनीमधून सदर रस्ता जात असून पोलीस प्रशासन हा रस्ता बंद करणार असल्याची माहिती सामाजिक प्रसार माध्यमातून व नागरीकांच्या निवेदनाव्दारे मिळाल्यानंतर नागरीकांची होणारी गैरसोय लक्षात घेता सदर रस्ता पुर्ववत प्रमाणे चालू ठेवणेबाबत या बैठकीमध्ये सुचना देण्यात आल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधिक्षक संजय जाधव, मुख्याधिकारी नगर परीषद वसुधा फड, जिल्हा प्रशासन अधिकारी नगर रचनाकार, राजाभाऊ पवार, आदीसह अनेक नागरीक उपस्थीत होते.