पुणे (प्रतिनिधी)- अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कामगार कल्याण मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत दरवर्षी केंद्र शासन व राज्य शासन मध्ये कार्यरत असणारे अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता राज्य - राष्ट्रीय पातळीवर विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अखिल भारतीय नागरीसेवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने यावर्षी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन श्री शिवछत्रपती क्रीडापीठ महाळुंगे - बालेवाडी पुणे, येथे दिनांक 17 ते 21 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले. आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्यशासन यांच्या वतीने सचिवालय जिमखाना मुंबई यांच्याकडे सोपवण्यात आली होती. या स्पर्धेत विविध राज्यांचे 22 संघ व 353 खेळाडू विविध वजन गटामध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन 2005 नंतर यावर्षी महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे करण्यात आले होते. दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सर्व संघांचे व्यवस्थापक व प्रशिक्षक यांची बैठक दुपारी चार वाजता पार पडली.स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता माननीय श्री चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्त पुणे, श्री सतीश जोंधळे सभापती सचिवालय जिमखाना मुंबई, मा. दमय्यावार साहेब अवर सचिव शालेय शिक्षण,क्रीडा व युवक सेवा मुंबई, स्पर्धा समन्वयक श्री जोगिंदर सिंग दिल्ली, स्पर्धा सचिव श्री संजय कदम, स्पर्धाप्रमुख श्री अरुण पाटील क्रीडा अधिकारी, सचिवालय जिमखाना मानद सचिव श्री संजय पोफळे (कुस्ती), तांत्रिक समिती प्रमुख श्री संदीप वांजळे या मान्यवरांच्या हस्ते पार पडले. सचिवालय जिमखाना मानद सचिव श्री संजय पोफळे यांनी महाराष्ट्र राज्य शासन कुस्ती संघाची निवड चाचणी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी लालबहादूर शास्त्री व्यायाम शाळा, मध्य रेल्वे माटुंगा मुंबई, या ठिकाणी आयोजित केली. या चाचणीद्वारे महाराष्ट्र राज्य शासनाचा कुस्ती संघ निवडण्यात आला. या संघामध्ये मौजे घुलेवाडी ता भूम येथिल राष्ट्रीय खेळाडू, आर टी ओ ऑफिस पिंपरी चिंचवड येथे कार्यरत असलेले पैलवान प्रा. महेश घुले 72 किलो ग्रिको यांनी प्रथम क्रमांक मिळवून संघात स्थान पक्के केले. हा संघ दिनांक 17 ते 21 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला.
पैलवान प्रा महेश घुले हे, राष्ट्रीय खेळाडू बजरंग क्रीडा मंडळ व व्यायामशाळा वाघीराचे संस्थापक श्री हरिभाऊ बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करतात. या राष्ट्रीय स्पर्धेत 72 किलो वजनगट मध्ये महेश घुले यांनी प्रथम फेरीत आनंदू कृष्णन केरळ यांचा दोन विरुद्ध दहा अशा गुण फरकाने पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशच्या अजय सिंग यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला, महेश घुले यांचा सामना आर.एस.बी. मुंबई संघाच्या अमोल कोंढाळकर यांच्याबरोबर झाला, या सामन्यात आठ गुणांच्या फरकाने विजयी होऊन महेश घुले यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम फेरीचा सुवर्ण व रौप्य पदकाचा सामना हरियाणाच्या असलम खान यांच्याबरोबर झाला या सामन्यात सहा गुणांच्या फरकाने पराभव पत्करावा लागल्यामुळे महेश घुले यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र ग्रीको रोमन संघाने सर्वसाधारण उपविजेतेपद प्राप्त केले,तसेच महिला संघाने सुद्धा सर्वसाधारण उपविजेतेपद प्राप्त केले या स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री दीपक शिवानंद पांडे (IPS) अप्पर पोलीस महासंचालक दळण वळण पुणे, रुस्तम ए हिंद पै.अमोल बुचडे, राष्ट्रीय स्पर्धा समन्वयक श्री जोगिंदर सिंग व इतर मान्यवर यांच्या हस्ते पार पडले.
अखिल भारतीय नागरी सेवा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महेश घुले यांनी रौप्य पदक प्राप्त केले, याबद्दल माजी आमदार राहुल भैया मोटे, युवा नेते सतीश सोन्ने, बाळासाहेब मोटे,मुकुंद मोटे,काकासाहेब शिकेतोड, नळी वडगाव घुलेवाडी उपसरपंच बिभीषण (नाना) वाघमोडे,उपसरपंच फुलचंद घुले, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पै अशोक वाघमोडे पै.रघुनाथ वाघमोडे पै.विठ्ठल वाघमोडे, बापूराव घुले, पै.दत्ता मेटे, पै.मामू जमादार, पै.अमोल वीर, पै.बाळू सुबुगडे, पै.मंगेश घुले, पै.अप्पा चव्हाण, पै.अनिल दाबेकर, पै.संभाजी दाबेकर,पै.संभाजी घुले, पै.विकास घुले,विलास घुले,रवींद्र घुले (कृषी अधिकारी) सचिन घुले, संतोष घुले, सुरेश घुले, आबासाहेब घुले, पै.सोपान घुले, कांतीलाल गोपाळघरे, महादेव गोपाळघरे, विकास गोपाळघरे, मिटु घुले, संदीप घुले, गणेश घुले, पांडुरंग फुंदे, बाजीराव घुले, एकनाथ डोंगरे, बाजीराव डोंगरे,खंडेराव डोंगरे, दत्तात्रय गोपाळघरे, ज्योतिर्लिंग घुले यांच्यासह घुलेवाडी गिरलगाव नळी वडगाव अंतरवली पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमी नागरिकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या