तेर - धाराशिव तालुक्यातील तेरणा धरणाजवळ असलेली चार गाव पाणि पुरवठा योजना पूर्ववत सुरू करावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्ष व आम आदमी पार्टी यांनी 3 फेब्रुवारीला इशारा दिला होता.20 फेब्रुवारीला तेर ग्रामपंचायत यांनी एक महीन्यात पाणी पुरवठा चालू करू असे लेखी आश्वासन सरपंच दिदी काळे यांनी दिल्यानंतर टाळे ठोको आंदोलन मागे घेण्यात आले.
बराच वेळा निवेदने देऊन आणि जलसमाधी आंदोलन करूनही,त्याचप्रमाणे मेढा या कंपनीने सोलर प्रोजेक्ट उभा करूनही तेर, ढोकी ,तडवळे आणि येडशी या चार गावचा पाणीपुरवठा ग्रामपंचायत कडून केला जात नाही .म्हणून दिनांक 3 फेब्रुवारी रोजी तेर ग्रामपंचायत कार्यालयास पंधरा दिवसात तेर ग्रामस्थांसाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा करावा असे निवेदन दिले होते. नाही केले तर आम्ही तेर ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन करणार आहोत असा इशारा दिला होता.
20 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता तेर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात येणार होते.परंतू तेर ग्रामपंचायत कार्यालयाने एक महीन्यात पाणि पुरवठा चालू करण्यात येईल असे लेखी आश्वासन सरपंच दिदी काळे यांनी दिल्याने ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोको आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी उपसरपंच श्रीमंत फंड, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन देवकते ,आपचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे आदी उपस्थित होते