धाराशिव - येथील स्त्री रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी फक्त ६० बेडची व्यवस्था आहेत. या रुग्णालयामध्ये धाराशिव शहरासह जिल्ह्यातून महिला मोठ्या संख्येने दाखवल होतात. बेड अभावी त्या महिलांना रुग्णालयात कानाकोपऱ्यात जिथे जागा मिळेल तेथील फरशीवरच नाईलाजास्तव चटई टाकून प्रसुतीसाठी थांबावे लागते. त्यामुळे त्यांची होणारी हेअरस्टार्ट थांबविण्यासाठी या रुग्णालयामध्ये आणखी १०० बेडची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते आनंद पाटील यांनी पालकमंत्री प्रतावराव सरनाईक यांची मुंबई येथे भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव येथे असलेल्या स्त्री रुग्णालयात ६० बेड आहेत‌. जिल्ह्याचे मुख्यालय असल्यामुळे धाराशिव शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील व शेजारील जिल्ह्यातील महिला रुग्ण प्रसुतीसाठी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे महिला रुग्णांना व नातेवाईक यांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच  या परिसरात कचऱ्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. मात्र नगर पालिकेचे याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार देखील पालकमंत्री सरनाईक यांच्याकडे केली आहे.
 
Top