तुळजापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर मंगळवार दि. 4 फेब्रुवारी रोजी रथसप्तमी निमित्ताने श्रीतुळजाभवानी मातेससंपुर्ण सुवर्ण अलंकार घालुन देविजींचा सिंहासनावर रथअलंकार महापुजा मांडण्यात आली होती. या रथअलंकार पुजे नंतर मक्ररसंक्रांत निमित्ताने गेली काही दिवसा पासुन चालु असलेल्या महिला हळदीकुंक सोहाळ्यांचा सांगता होता.
रथअलंकार महापुजा ही वर्षातुन तीन वेळेस श्रीतुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर मांडली जाते रथसप्तमी तसेच शारदीय नवराञ व शाकंभरी नवराञ उत्सवात ही पुजा मांडली जाते. देविचा वार मंगळवार याच दिवशी आलेली रथसप्तमी पार्श्वभूमीवर देविजींच्या सिंहासनावर मांडण्यात आलेली रथअलंकार महापुजा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज दिवसभर सुमारे लाखभर देविदर्शन भाविकांनी घेतले.