तुळजापूर (प्रतिनिधी) -तुळजापूर आगाराला राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या बसेसचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवासी आणि चालक-वाहक यांच्या हस्ते पूजन करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी लालपरीमधून आमदारांसाठीच्या आरक्षित सीटवर बसून प्रवास करत नवीन बसची माहिती घेतली. आरामदायक आणि आधुनिक सुविधा असणाऱ्या बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आणि राज्य सरकारचे आभार मानले.
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करत जिल्हयासाठी पंचवीस व तुळजापूर साठी 10 नवीन बस उपलब्ध करून दिल्या आहेत. या 10 नवीन बस मुळे भाविक प्रवाशांची सोय होणार आहे. यामुळे तुळजापूर बस आगारच्या अर्थिक उत्पनात व प्रवासीसेवेत वाढ होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने धाराशिव जिल्ह्यासाठी 25 नवीन अशोक लेलँड कंपनीच्या बीएस-6 बसगाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यात तुळजापूर आगारासाठी 10 बसगाड्या देण्यात आल्या आहेत.