परंडा (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी धाराशिव येथे कामांबाबतची आढावा बैठक घेतली. 

या बैठकीत मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना कसलीही तडजोड न करता कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

यावेळी मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांनी आवाटी, परंडा, वारदवाडी या मोठी रहदारी असलेल्या रस्त्याचे काम अर्धवट रखडले असून त्यामुळे वाहनचालकांना व नागरिकांना विशेषत: परंडा शहरातील जनतेस खूप त्रास सहन करावा लागत असल्याचे तसेच धाराशिव जिल्ह्यातील काही ठेकेदारांना कार्यारंभ आदेशानंतर अनेकवेळा मुदतवाढ देऊनही अद्याप कामे सुरूच केली नसल्याचे निदर्शनास आणून दिले असता तात्काळ उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. 

बैठकीस जिल्हाधिकारी, सा. बां. विभागाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता व विभागाचे सर्व अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top