धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालयात ( दि. 13) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा कामाचा झपाटा, विकासाची दृष्टी, राज्यातील दादांच्या नेतृत्वावर तसेच जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांचे जिल्ह्यातील नेतृत्वावर विश्वास ठेवीत धाराशिव तालुका व शहर मधील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. तसेच बालाजी भारत वगरे यांची जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ताकद वाढलेली दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये धाराशिव तालुक्यातील असंख्य युवक यांचा जाहीर पक्षप्रवेश झाला. योगेश अग्निहोत्री, सलीम पठाण, बालाजी वगरे, दत्ता देशमुख, रसूल शेख, सुरज घुले, बाळासाहेब गायकवाड, मुक्तार शेख, नागेश नाईकवटे, तुकाराम घोडके, काकाजी अंकुशे, विष्णू पवार, राजेश मिटकरी, दत्ता क्षीरसागर, निलेश जाधव, अशोक मोठे, मुरलीधर ढवळे, श्याम चव्हाण, आकाश क्षीरसागर, संतोष काकडे, विलास जाधव, सागर कदम, बाबासाहेब इतबारे, महेश गोडसे, भागवत खंडाळकर, सागर शिंदे, गोरोबा गोडसे, केशव शिंदे, अण्णा सुरवसे, आबा ढवळे, गणेश घायतडक, सागर शिंदे, उमेश शिंदे, गोरोबा गोडसे, गायकवाड दयानंद, अन्सार शेख, रजाक तांबोळी, सचिन साळुंखे, अमोल वगरे, राजेश कांबळे, दादासाहेब राऊत, विजय दाडे, पांडुरंग पाटील आदी युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. नवनियुक्त पदाधिकारी आणि पक्षांमध्ये प्रवेश केलेल्या युवकांचा जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे व प्रमुख पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन मजबूत करू व पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत राहू व दिलेल्या संधीचे सोने करू असे त्यांनी या पक्षप्रवेशावेळी सांगितले. उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व युवकांना जिल्हाध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मार्गदर्शन केले.
या वेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, प्रदेश सचिव खलील पठाण, जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दीन मशायक, धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष ॲड.इंद्रजीत शिंदे,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार, ज्येष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष नारायण तुरुप,विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने, धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे,धाराशिव युवक शहराध्यक्ष निहाल शेख,आंबेजवळगा जि.प. गटप्रमुख सुरेश राठोड, प्रज्योत बनसोडे नागराज साबळे शैलेंद्र शिंगाडे राहुल ठवरे, किरण वाकुरे अभिमन्यू पवार सतीश कानडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.