परंडा (प्रतिनिधी) - येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे लातूर बोर्डाने आयोजित केलेल्या उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा 2025 दिनांक 11 फेब्रुवारी पासून सुरु झाले आहेत. या केंद्रावर एकूण 520 विद्यार्थी संख्या असून बोर्डाने दिलेल्या नियमानुसार सूचनांचे काटेकोरपणे पालन करत परीक्षा सुरळीतपणे सुरू आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचे केंद्र प्रमुख शंकर कुटे हे काम पाहत आहेत.कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. किरण देशमुख महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.महेश कुमार माने यांचे या परीक्षेवर नियंत्रण असून परिक्षेच्या वेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून पोलीस कर्मचारी नियुक्त केल्यामुळे त्यांचे सहकार्य लाभत आहे.