तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरापासुन सहा किलोमीटर अंतरावर नळदुर्ग रोडवरील हंगरगा पाटीजवळ असणाऱ्या कुलस्वामिनी सुतगिरणीच्या गोडावुनला गुरुवार  दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी आग लागुन यात कापसाच्या गाठी सह अन्य साहित्य जळुन लाखो रुपयाचे नुकसान झाले.

सदरील आग गुरुवार दि. 13 फेब्रुवारी रोजी अकरा वाजता लागली होती. कुलस्वामिनी सहकारी सुतगिरणी ही खाजगी मालकास भाड्याने चालविण्यास दिल्याचे समजते. गुरुवार दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता अचानक सुतगिरणीच्या गोडावुनमध्ये आग लागली. ती वाढत जावुन बाजुला असलेल्या हाँलमध्ये पसरली. येथे कापुस गाठी असल्याने ती वाढत गेली. नगरपरीषदअग्निशमन वाहन आले पण आग जास्त पाणी विझवण्यास कमी पडल्याने ती वाढत गेली. नंतर धाराशिव, नळदुर्ग, सोलापूर येथील अनिशमन दलाचे वाहने आणुन आग शर्तीचे प्रयत्न करुन विझावली. आग कशामुळे लागली. यात अर्थीक नुकसानचा नेमका आकडा पुढे येवु शकला नाही. आग कशाने लागली याचे कारण अद्याप कळाले नाही. माञ या आगी बाबतीत वेगळीच चर्चा चविष्टतेने चर्चिली जात होती.


 
Top