भुम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार आणि ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आज प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मंजूर 13 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी प्रमाणपत्र ग्रामपंचायत कार्यालय बऱ्हाणपूर येथे पुष्पगुच्छ देऊन मंजुरी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक आलापुरे मॅडम, उपसरपंच नेहा मिसाळ, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशन तालुकाप्रमुख पांडुरंग धस, माजी सरपंच विलास पाटील, युवा सेनेचे धनंजय पाटील कुबेर वारे निलेश पाटील बालाजी मिसाळ विशाल पाटील दौलत पाटील, अंगणवाडी सेविका शांताबाई वारे, आशा सेविका मीनाताई दरेकर, सुभाष पाटील अंजना शेलार संजय सावंत प्रवीण शेलार जयसिंग वारे प्रकाश पाटूळे विजया धस निलावती वारे ग्रामपंचायत सदस्य गणेश वारे,तसेच नागरिक उपस्थित होते. घरकुल लाभार्थ्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार महायुती आभार व्यक्त केले.