भूम (प्रतिनिधी)- नवीन कायद्याच्या प्रसार व प्रचारासाठी भारत सरकारने सर्व राज्यांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री व गृह मंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी 100 दिवस नवीन कायदयाचा प्रसार व प्रचार करुन जनजागृती करावी यासाठी धाराशिव जिल्ह्यात,पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन, पोलीस उपअधीक्षक गौरीशंकर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनानुसार भूम शहरात  दिनांक 18/02/2025 रोजी महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षां साबळे आणि त्यांच्या पिंक पथकाने जिल्हा परिषद हायस्कूल, भूम येथे मुलीना सुरक्षा बाबत मार्गदर्शन केले. डायल 112 संबंधित माहिती देऊन, त्यांना नविन कायद्याबद्दलही मार्गदर्शन केले. या प्रकारचा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण मुलींना त्यांच्या सुरक्षेबाबत जागरूक करणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देणे खूप आवश्यक आहे.

अशा प्रकारचे कार्यक्रम समाजात सुरक्षा जाणीव वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकारांची आणि संरक्षणाच्या उपाययोजना जाणून घेणे, तसेच इतर महत्त्वपूर्ण कायद्यांचा अभ्यास करणे, यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते आपल्या सुरक्षेसाठी सक्षम होतात.

विद्यार्थ्यांना नवीन कायद्यांविषयी माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते त्यांच्या अधिकारांची आणि कर्तव्यांची जाण ठेवून अधिक सजग आणि सुरक्षित राहू शकतात. काही महत्त्वाचे कायदे आणि त्यांची माहिती पोलीस उपनिरीक्षक वर्षा साबळे  पिंक पथक प्रमुख यांनी विद्यार्थ्यांना दिली. त्यात पीडित महिलांसाठी कायदे (नारी संरक्षण कायदा)- भारतीय दंड संहिता 354, 354, 376,354, ऐवजी नवीन कायद्यानुसार आता बी. एन. एस. 64,65,74,75 करण्यात आले आहे.यासारख्या कलमांद्वारे महिलांवरील अत्याचार, छळ आणि बलात्कारासंबंधी कडक शिक्षा दिली जातात. महिला आणि मुलींच्या सुरक्षा संबंधी कायद्यात वाढत्या दृष्टीकोनाने संरक्षण दिले जाते.

प्रौढावस्थेतील लैंगिक अत्याचार विरुद्ध कायदे- POSCO  कायदा मुलींच्या आणि मुलांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार, अत्याचार करणाऱ्याला कडक शिक्षा, त्यात लहान मुलींच्या परिस्थितीत कठोर कारवाई केली जाते.

सार्वजनिक स्थळी लैंगिक छळ- या कायद्यामुळे कोणत्याही कार्यस्थळी किंवा सार्वजनिक ठिकाणी महिला आणि मुलींना लैंगिक छळापासून संरक्षण मिळते.महिलांच्या सुरक्षिततेसाठी या कायद्याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. डायल 112 सेवा-विद्यार्थ्यांना डायल 112 सेवा संदर्भात माहिती दिली जाते. हा आपात्कालीन सेवांसाठी (जसे की पोलिस, अंबुलन्स, अग्निशमन सेवा) एकत्रित आपत्कालीन हेल्पलाइन नंबर आहे. 112 वर कॉल करून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळवता येते. नशेच्या पदार्थांविरुद्ध कायदे- नशेच्या पदार्थांचा वापर आणि वितरणासंबंधी कडक कायदे आहेत. विद्यार्थ्यांना या कायद्याबद्दल माहिती देऊन, नशापान किंवा दारूच्या सेवनाच्या धोक्यांपासून बचाव करण्यास प्रवृत्त केले जाते.

बाल कामगार कायदा- विद्यार्थ्यांना बालकामगार कायद्याबद्दल माहिती दिली जाते. हा कायदा सांगतो की, 14 वर्षांखालील मुलांना कामावर ठेवण्यास मनाई आहे. तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया वापराचे कायदे- सोशल मीडियावर होणाऱ्या छळ, गाली-गलौच, सायबर अपराध याविरोधात कायदेकडे मार्गदर्शन.

विद्यार्थ्यांना इंटरनेट सुरक्षा, गोपनीयता आणि सायबर गुन्ह्यांविषयीची माहिती दिली जाते, ज्यामुळे ते इंटरनेटवर सुरक्षित राहू शकतात. अशा कायद्यांबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक करून त्यांना त्यांचे हक्क आणि कर्तव्य समजावून देणे खूप आवश्यक आहे. यामुळे ते समाजात अधिक सकारात्मक आणि सुरक्षितपणे वावरू शकतात. विद्यार्थ्यांना नवीन कायद्यांविषयी माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते त्यांच्या अधिकारांची आणि कर्तव्यांची जाण ठेवून अधिक सजग आणि सुरक्षित राहू शकतात.  या कार्यक्रमास वर्षा साबळे पोलीस उपनिरीक्षक पिंक पथक प्रमुख, पिंक पथक उपविभाग भूम येथील माहिला नाईक मते, पोलीस शिपाई नागटिळक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top