तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन भूमित पोलिस खाते सुरक्षे बाबतीत सजग असताना चक्क तुळजापुरात विक्री करता येणारे पुड्या रुपात एमडी अमली पदार्थ पोलिसांनी तामलवाडी टोल नाक्या जवळ पकडल्याचा घटनेने तिर्थक्षेञ तुळजापूर हादरुन गेले आहे. शिवजयंती कालावधीत पोलिस खाते सजग असताना हे ड्रग्ज सापडले हे विशेष. यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे हे ड्रज सर्वाधीक वर्दळ असणाऱ्या सोलापूर तुळजापूर महामार्ग रस्त्यावर पकडले आडमार्ग ने आणले जाणारे अमली पदार्थ चक्क महामार्गाने आणले जात असेल तर निश्चित यात संशियाची सुई पोलिस व महामार्ग पोलिस खात्याकडे वळते. एरव्ही इंट्रीसाठी भाविकांची वाहने तपासले जातात. सोलापूरहुन सरहद्द वरुन हे ड्रग्ज कसे तामलवाडी टोलनाका पुढे कसे पकडले. यात ड्रग्ज आणताना तुळजापूरचे दोन तरुण पकडल्याने ड्रग्स विक्रीचे रँकेट तुळजापूरात पोहचल्याचे स्पष्ट होते.
यामुळे ड्रग्सची पाळेमुळे खोल रुजल्याचे दिसुन येत आहे. तुळजापूर तालुका हा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सरहद वर असणारा तालुका आहे. तुळजापूर सोलापूर महामार्ग रस्ता हा सर्वाधिक वर्दळ आहे या रस्त्यावर सरहदवर टोल नाक्यावर महामार्ग वाहतुक शाखा पोलिस व स्थानिक पोलिसांचा राबता असता तरीही ड्रग्ज चक्क महामार्गावरुन आणले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.यापुर्वी याच मार्गावरुन ड्रग्ज आले किती याचा ही शोध घेणे गरजेचे बनले आहे. दारु पासुन सुरु झालेला तिर्थक्षेञ तुळजापूर चा प्रवास ड्रग्स पर्यत पोहचला आहे अजुनही वेळ गेलेली नाही ड्रग्ज आहेरी गेलेली मंडळी ड्रग्ज नाही मिळाले तर अस्वस्थ होतात असे समजते यातुन हिंसक घटना घडण्याची शक्यता आहे.
ड्रग्स येथे पोहचु नये यासाठी प्रशाषणाने कठोर,पावले उचलणे काळाची गरज बनली आहे अन्यथा तिर्थक्षेञ तुळजापूरची शांतता धोक्यात येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. तुळजापूर येथे ड्रग्स रँकेट कोन चालवते या संबंधित मंडळीवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
याच तालुक्यातील पण मुंबई पुणे येथे व्यवसाया निमित्ताने गेलेल्या मंडळी माध्यमातून तिर्थक्षेञ तुळजापूरात अमली पदार्थ पोहचल्याची चर्चा आहे सोलापूर मार्ग तुळजापूर ला येणारे ड्रग्ज येथुन परजिल्हयात सप्लाय होत असल्याची चर्चा आहे मागील काही महिन्यात सोलापूर येथे ड्रग्स साठा पकडला होता त्याचा तपास करीत अधिकारी तुळजापूरात पोहचले होते माञ आरोपी सावध झाल्याने तो पोलिसांचा हाती लागला नसल्याचे समजते. शनिवारी ड्रग्स सापडताच यातील मुख्य आका हवालदील दिसला त्याने आपले कुठले माणसे सापडली याची विचारपूसकेल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तिर्थक्षेञ तुळजापूर नगरीत ड्रग्स विक्रीस आणले जाणे पुर्वीच पकडले जाने ही घटना गंभीर आहे. तिर्थक्षेञ तुळजापूरचा शांतता अवैध धंदे मुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे, तिर्थक्षेञ तुळजापूर शांत ठेवण्यासाठी खुद्द आता मुख्यमंत्री तथा गृहमंञी देवेंद्र फडणवीस यांनीच जातीने लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.