कळंब (प्रतिनिधी) कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील जिल्हा  परिषद प्रशालेत दि.६ फेब्रुवारी २०२५ रोजी  स्टुडंन्ट पोलीस कॅडेट (एस.पी.सी.) कार्यक्रमाची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. धाराशिव येथील स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी व इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलीस उपनिरीक्षक श्री इकबाल सय्यद (धाराशिव) व श्री आतिश सरफळे पो. नाईक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एस. यु. कोकाटे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामस्थ चाँद पाशा सय्यद हे होते. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक श्री. इकबाल सय्यद यांनी आपल्या मार्गदर्शनात सायबर क्राईम (गुन्हे),बाल कामगार,बाल गुन्हेगारी, तसेच रहदारी नियम,हेल्मेट चा वापर, वाहन चालवताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर, स्वतःचे संरक्षण, या बाबत सय्यद यांनी मार्गदर्शन केले. तर सरफळे यांनी महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचार विरुद्ध कसा लढा दिला पाहिजे, रस्ता सुरक्षा आणि रहदारी, वडीलधाऱ्या चा आदर करणे, समाजातील वाईट गोष्टी विरुद्ध लढा  या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर. एस. पवार यांनी केले तर श्री. डी.एस. काळे यांनी आभार मानले. या कार्यशाळेसाठी प्रशालेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top