तुळजापूर (प्रतिनिधी)- धारशिवचे पूर्व जिल्हाधिकारी सनदी अधिकारी डॉ सचिन ओंबासे यांची नुकतीच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून प्रशासकीय बदली झाली. तुळजाभवानी मंदिर संस्थान च्या पूर्व आणि नवनियुक्त कर्मचाऱ्यांकडून मिळून त्यांचा निरोप समारंभ आयोजित करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मंदिर संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मा.जिल्हाधिकारी यांच्या कार्यपद्धती बद्दल कौतुक करताना मंदिर संस्थान बाबत मार्गदर्शन पुढेही मिळावे अशी विनंती केली. डॉ. सचिन ओंबसे यांनी देखील आपल्या जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष म्हणून करकीर्दीबाबत समाधान व्यक्त केले. मंदिर संस्थांच्या पूर्ण झालेल्या, चालू असलेल्या आणि प्रलंबित कामाचा आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव, तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे, संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने तसेच मंदिर संस्थानचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top