धाराशिव (प्रतिनिधी)- “डॉक्टर घडवणारा शिक्षक“ अशी ओळख असलेल्या प्रा. सोमनाथ लांडगे यांची विद्यार्थी व पालकांसाठी प्रकट मुलाखत होणार आहे. ही प्रकट मुलाखत प्रबोधन युवाशक्ती व सोनई शिक्षण संस्था पुणे यांनी आयोजित केलेली आहे.
बील गेट्स ज्युनिअर कॉलेज धाराशिव येथे प्राचार्य, श्री साई श्रध्दा एज्युकेशनचे संचालक तसेच प्रवेश समुपदेशक म्हणून काम करत असलेल्या प्रा. सोमनाथ लांडगे यांनी संपूर्ण जगात आलेल्या कोविडच्या त्रासदीनंतर मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवू इच्छित असणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अल्प फीस मध्ये नीट ऑनलाइन टेस्ट सिरीज हा नवीन प्रकार आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत विकसित केला आहे.
गेल्या पाच वर्षात आनेक गोर-गरीब विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिलेला आहे. पहिल्या वर्षात स्वतःच्या मुलासह तीन, दुसऱ्या वर्षात 74, तिसऱ्या वर्षात 92 तर या वर्षात 119 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस, बीएचएमएस ला प्रवेश मिळवून दिलेला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी सर्वसामान्यं व गरीब घरातून येतात. सामाजिक क्षेत्रात काम करीत असतानाच वैद्यकीय क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देऊन नावलौकिक मिळवलेले प्रा. सोमनाथ लांडगे यांची “डॉक्टर घडवणारा शिक्षक“ या सदरामध्ये पुणे येथे प्रा. डॉ. सुनील धनगर व प्रा. अनुजा देशपांडे हे दोघे श्री बाळासाहेब ठाकरे कलादालन सारसबाग, पुणे येथे दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता मुलाखत घेणार आहे.
या विशेष मुलाखतीला मा. डॉ. रघुनाथ कुचिक अध्यक्ष किमान वेतन सल्लागार मंडळ महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष प्रबोधन युवाशक्ती तसेच मा. राहुल मोकाशी अध्यक्ष सोनई शिक्षण संस्था पुणे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वृंदावन फाउंडेशन पुणे, श्री साई श्रद्धा एज्युकेशन व नीट ऑनलाइन टेस्ट सिरीज या संस्थांची संकल्पना असणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रा. देविदास बिनवडे, शुभम दिघे, तेजस गडसुंद व उमेश साळुंखे यांनी आव्हान केले आहे.