धाराशिव :   डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांच्या परिपत्रकानुसार आज दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी  संविधान गौरव महोत्सव अंतर्गत  व्याख्यानाचे आयोजन केले होते.त्यानिमित् प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवाजी गायकवाड बोलताना म्हणाले की ," भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय  ही उद्दिष्टे साध्य झाली का? ती साध्य करण्यासाठी घटनेची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणे अगत्याचे आहे. ही उद्दिष्टे 75 वर्षात साध्य न झाल्यामुळे आज अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. 370 कलम लागू केले तरी काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. कलम 44  समान नागरी कायदा असला तरी  कलम 25 ते 29  धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार असल्यामुळे  समान नागरी कायदा लागू करणे  जिकिरीचे बनले आहे.  खाऊजा धोरणामुळे समाजामध्ये विषमता निर्माण झाली आहे.  जिथे विषमता असते तिथे समता नांदू शकत नाही. स्वातंत्र्य,समता, बंधुता  एकमेकासाठी पूरक आहेत.  जात आणि वर्ण व्यवस्था कायम टिकून ठेवल्यास देश एकसंघ राहू शकत नाही . देश एकसंघ राहण्यासाठी धार्मिक सहिष्णुता, समाजात रुजवणे महत्त्वाचे आहे. डॉ.आंबेडकरांना संविधान लिहिताना 432 पेनाच्या निब्स झिजवाव्या लागल्या. यातूनच संविधान लिहिण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम लक्षात येते. धार्मिक ध्रुवीकरणाच्या  या सांप्रत  काळात पुन्हा एकदा  देश गुलामगिरीत जाईल का ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची शंका खरी ठरते की काय?  असा सवाल  त्यांनी केला. "

 याप्रसंगी  प्रस्तावना करताना  प्रा. स्वाती बैनवाड  म्हणाल्या की, " भारतीय संविधानाचा वर्धापन दिन साजरा करताना भारतीय संविधान 395 कलम 22 भागात  विभागलेला आहे. आणि आठ परिशिष्टे आहेत. संविधानाने लोकशाहीची मूल्ये दिली. जगातील सर्वात मोठी राज्यघटना या देशाची आहे.  हे घटना या देशातील असंख्य लोकांचे अशास्थान आहे. तो भारतीय चा धर्मग्रंथ आणि दस्तऐवज आहे. असे प्रतिपादन केले.
 याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष   डॉ. छाया दापके होत्या,उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, " भारत ही राजे राजवाड्यांची भूमी होती. एकसंघ आणि एकात्म ठेवण्यासाठी लोकशाहीची गरज होती. इंग्लंडमध्ये लोकशाहीला सुरुवात झाली. इंग्लंड ही लोकशाहीची जननी आहे. मात्र भारतामध्ये 26 जानेवारी 1950 या दिवशी  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आम्ही लोकशाही स्वीकारली. या लोकशाही मार्गानेच आपली 75 वर्षाची वाटचाल समृद्धतेने चालू झाली आहे. भविष्यात  सर्वधर्म संप्रदाय यांना सोबत घेऊन ही लोकशाही  एकात्मतेचे दर्शन घडवेल. असे प्रतिपादन केले. 
यावेळी प्रा. माधव उगिले  प्रा. डॉ. वैशाली बोबडे, प्रा. सुवर्णा गेंगजे, प्रा.मंगेश चेंडके, प्रा सुप्रिया शेटे, प्रा.स्वाती देडे बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला.
 
Top