धाराशिव (प्रतिनिधी)-क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पूणे नाशिक विभाग अंतर्गत ग्रपलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, यांच्या संयुक्त वद्यमाने आयोजित, नाशिक येथे घेण्यात झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा 2024.2025 मध्ये धाराशिव येथील कु. आनंदी उषा अविनाश शिंदे हिने सुवर्णपकाची कमाई केल्यामुळे तिच्या यशाचे कौतुक करण्यासाठी मुद्रा सहकारी पतसंस्था धाराशिव चेरमल व संचालक यांचे तर्फे आनंदी शिंदे व तिच्या आईवडीलांना बक्षीस देवून सत्कार करण्यात आला.
या वेळी आनंदी हिने आपले मनातील भावना व्यक्त करत माझ्या यशामागे माझे आई वडील, प्रशिक्षक व शालेय गुरुवर्य या सर्वांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे तिने सर्वांचे ऋण व्यक्त केले. आनंदी हिच्या वडीलांनी आजच्या जिवघेण्या स्पर्धेत आईवडीलांनी आपल्या पाल्याचा टक्का राखीव करण्याचा सल्ला दिला. मुलीनी शालेय कीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे व पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिले पाहीजे असे म्हटले. वाढूनक उदद्याचे उज्वल नेतृत्व उदयास येईल असे म्हटले.
संस्थेचे चेअरमन श्रदत्तात्रय विष्णू भालेकर यांनी आनंदी हिच्या बद्दल गौरवोदगार काढताना म्हटले कि राजमाता जिजाऊ तशेच सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळवासमोर ठेऊन आजची मुलींची पिढी घडत आहे. त्यामुळे मुलींनी जास्तीत जास्त स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक आहे. बदलत्या काळाबरोबर जाण्याची आवश्यकता आहे. आनंदी हिने राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पात्र होऊन यश मिळवावे यासाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच मुद्रा परिवार तिच्यासोबत आहे असे आश्वासन दिले. मुद्रा परिवारातील उपाध्यक्ष सोमलिंग खरे तसेच संचालक दयानंद चव्हाण, बलराम माने, सौ. विक्रया चव्हाण, बालाजी पवार, विनोद शेरकर, सौ. तेजश्री जगदाळे, सौ. कंबा काळे, राजपाल कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून आनंदीस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व मुद्रा परीवार व आनंदी हिचा मित्रपरीवार उपस्थीत होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्थेचे व्यवस्थापक कवडे खंडेराव यांनी केले व आभार प्रदर्शन दयानंद चव्हाण यांनी केले.