धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांअंतर्गत कर्ज घेतलेल्या आणि थकीत असलेल्या कर्जदारांसाठी महामंडळाने विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार संपूर्ण थकित कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याजाच्या रकमेवर 50 टक्के सवलत दिली जाणार आहे.ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत लागू असणार आहे.
जिल्ह्यातील महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन कर्जमुक्त होण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक,महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी ओबीसी महामंडळ,जिल्हा कार्यालय, सामाजिक न्याय भवन(02472) 223863 या दूरध्वनी क्रमांकावर करावा.