तुळजापुर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आलियाबाद येथील सुपुत्र श्रीयुष सुनिता संजय चव्हाण हिचा महाराष्ट्र क्रिकेट 14 वर्षाखालील संघात निवड झाली आहे. श्रीयुषने निवड सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि निवडकर्त्यांना आकर्षित केले. निवडक सामन्यांमध्ये त्याने नाबाद 154, नाबाद 108 तसेच 95 आणि 91 धावा केल्या.
श्रीयुषच्या लहानपणीच त्याचे वडील संजय आणि आई सुनीता यांनी श्रीयुषला क्रिकेटर बनवण्याचे. राज्य आणि देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले. 14 वर्षांखालील महाराष्ट्रात निवड होऊन श्रीयुषने मोठे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल यशस्वीपणे पूर्ण केले. यासाठी पुण्यातील नावाजलेलं अंबिशियस क्लबचे कोच मनीष देसाई व क्लब ओनर सुनील मुथा यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी सभापती प्रकाश चव्हाण, माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, सरपंच सुर्यकांत चव्हाण उपसरपंच अमृता चव्हाण, सुभाष नाईक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनायक चव्हाण, शिवाजी पोलीस पाटील, पांडुरंग चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुर्यकांत राठोड, माणिक राठोड, यशवंत राठोड, सिद्राम पवार, शिवाजी चव्हाण हरीदास राठोड, बाबु राठोड, देविदास चव्हाण,हरीदास चव्हाण यांच्या सह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.