तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील कदमवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.विठ्ठल जरासंध मिसाळ यांची निवड करण्यात आली. तसेच या स्नेह संमेलनाचे उद्घाटन
मंगरूळ बिटचे विस्तराधिकारी मल्हारीमाने यांच्या करण्यात आले. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल जरासंध मिसाळ हे होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदुरी केंद्राचे केंद्रप्रमुख वाले, ग्रामपंचायत सदस्य श्री.ज्ञानेश्वर कदम, सुरेश कोकरे, ग्रामसेवक समाधान मार्तंडे, विकास अधिकारी अमोल घोरपडे होते. यावेळी चित्रपट गीते विविध, शेतकरी गीत, विनोदी गीते, बालगीते, लीलीपुट डान्स, कोळीनृत्य, गोंधळ गीत, धनगर गीत, लावणी अशा विविध कलागुणांचा अविष्कार चिमुकल्यांनी सादर करुन सर्व गावकऱ्यांची मने जिंकली.. गावातील नागरिकांनी शाळेसाठी बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एकूण बक्षीस 25 हजार रूपये एवढी विक्रमी रक्कम जमा झाली.
यावेळी मुख्याध्यापक शेख, घोडके, वडणे, ग्रामपंचायत सदस्याजयश्री साळुंके, मंगल शितोळे, ज्येष्ठ नागरिक मच्छिंद्र मोरे, गुलाब वडणे, सूर्यकांत पाटील उपस्थितीत होते. गा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती भुतेकर एस.आर. व आभार थोडसरे आर.के. यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच अंगणवाडी सेविका सौ. स्नेहा कदम, ग्रामपंचायत कर्मचारी मारुती पवार, जय हनुमान गणेश तरुण मंडळ, व सर्व पालक, समस्त गावकरी यांचे सहकार्य लाभले.