धाराशिव (प्रतिनिधी)- मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती धाराशिव यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 395 व्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 10 फेब्रुवारीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राणाजगजितसिंह पाटील उपस्थित राहणार आहेत. 

10 फेब्रुवारीला भव्य ध्वजोरोहण होणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याभोवती केलेली सजावट व लाईट शो चे उद्घाटन माजी मंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य व सुधीर पाटील उपस्थित राहणार आहेत. 14 फेब्रुवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ चौक येथून शोभायात्रा सकाळी काढण्यात येणार आहे. याचे उद्घाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदचे सीईओ मौनिक घोष, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके, पोलिस निरीक्षक शकील शेख, आण्णासाहेब मांजरे, सचिन बेंद्रे हे उपस्थित राहणार आहेत. तर 16 फेब्रुवारी रोजी होम मिनिस्टरचा कार्यक्रम होणार आहे. त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते मिलिंद पाटील, सिध्दविनायक ग्रुपचे दत्ता कुलकर्णी, अजित पिंगळे, डॉ. तानाजी लाकाळ आदी उपस्थित राहणार आहेत. 18 फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव पाळणा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यांचे उद्घाटन यशदा परिवाराचे सौ. सुप्रिया सस्ते यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सौ. अस्मिता ओम्बासे, खासदार प्रणिती शिंदे, सिन अभिनेत्री जान्हवी किल्लेकर या उपस्थित राहणार आहेत. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक सकाळी 9 वाजता आमदार राणाजगजितसिंह पाटील व सौ. अर्चना पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन वसंत नागदे, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आदी उपस्थित राहणार आहेत. जिजामाता उद्यान जवळ विठ्ठलसाई साखर कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांच्या हस्ते शिवमुर्ती पूजन होणार आहे. यावेळी पोलिस अधीक्षक संजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार आदी उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी जिजामाता उद्यानपासून शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक निघणार आहे. यांचे उद्घाटन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष विश्वास शिंदे, प्रकाश जगताप, भारत कोकाटे आदी उपस्थित राहणार आहेत. 


 
Top