धाराशिव (प्रतिनिधी)- न्यू हायस्कूल कडकनाथवाडी येथे 14 फेब्रुवारी 2025 इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आनंद खुणे यांनी मुलांना मार्गदर्शन केले . तसेच या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.ए. क्षिरसागर यांनी केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक रामकिसन पौळ यांनी मुलांना 10 वी परीक्षे विषयी मार्गदर्शन केले. इयत्ता 10 वीतील श्रावणी जगताप, प्रज्ञा धावारे, राजेश्वरी ताटे यांनी मनोगत व्यक्त केले. या स्वंयशासन दिनानिमित्त इयत्ता 10 वीतील विद्यार्थ्यांनी प्रशालेचे कामकाज पाहिले. तसेच त्यांच्यासाठी अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ.9वी विद्यार्थीनी शिवांजली मनगिरे हीने तर आभार प्रदर्शन रोमिसा हवालदार हीने केले.