परंडा (प्रतिनिधी) - तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंजा  येथे 2024 परिक्षेतील मुंबई पोलीसमध्ये निवड झालेल्या दोन्ही शेतकरी पुत्राचे भोंजा येथे विनायक दत्तात्रय नेटके व कुभेंजा येथील कृष्णा मारूती ननवरे यांची पोलिस पदी निवड झाल्याबद्दल मान्यवर व शिक्षक वृंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी मसरपंच बाळासाहेब टमटमे, सदस्य दत्तात्रय नेटके, उपसरपंच जालिंदर टमटमे, डायरेक्टर गणेश नेटके, शालेय समिती अध्यक्ष सुब्राव मोरे, शालेय समिती सदस्य चे बापू मांजरे, बिरमल कोंडलकर, हनुमंत जगताप, मुख्याध्यापक बाळासाहेब घोगरे, शिक्षक वृंद सोमनाथ पवार, आदिकराव शेळवणे, राऊत मॅडम, ज्योती माळी, वर्षा नेटके, श्रीराम भांदुर्गे, पिंटू ननवरे, दादासाहेब टमटमे, देविदास सरवदे, अशोक सुतार, शाळेतील विद्यार्थी व परिसरातील ग्रामस्त सत्काराला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top