तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील उपजिल्हा रुग्णालयातुन एम. आर. आय आणि सि.टी. स्कँन मशीन इतरञ हलविण्या प्रकरणी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील व काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे या मशीन हलविण्याचे रद्द करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने धाराशिव व तुळजापूर येथील एम. आर. आय व सी.टी. स्कँन (6.7) मशीन वरील संदर्भीय पत्रानुसार कोल्हापूर व लोणावळा येथे नेण्यासाठी आदेश काढले आहेत. येथे महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून लाखो भाविक भक्त दर्शनात येतात. त्या दृष्टीकोनातून तुळजापूर येथे एम. आर. आय व सि.टी स्कॅन ची सुविधा सुरू केली होती. परंतु या महायुतीच्या गलथान कारभारामुळे तुळजापूर ग्रामीण रुग्णालयाची अवस्था बिकट होत चालली आहे. रुग्ण सेवा, तसेच दररोज आपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. आरोग्य विभागाने तुळजापूर उप-जिल्हा रुग्णालय येथील वैद्यकिय सुविधा काढून घेणे हे भाविक रुग्णावर, अन्यायकारक आहे. महाविकास आघाडीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड.धिरज पाटील, शाम पवार, अमर चोपदार, सुधीर कदम, सुनिल जाधव, राहुल खपले, बापुसाहेब नाईकवाडी, साळुंके, जगताप आदींनी मागणी केली होती.