धाराशिव(प्रतिनिधी) - अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करून अहेमद कुरेशी यांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून यशस्वी प्रगती केली आहे. हे समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण असून जिल्ह्याच्या विकासासाठी देखील आपण जीवन जगत असताना प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करताना एका जीवाने, एका दिलाने जिल्ह्याच्या विकासासाठी व प्रगतीसाठी प्रयत्न करून पुढे जाऊ शकतो. यशाचे शिखर सहजपणे गाठू शकतो. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे एका दिलाने व जिवाने प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि.1 जानेवारी रोजी केले.
धाराशिव शहरातील एक तेरा सात ग्रुपच्यावतीने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांचा सत्कार व संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एक तेरा सात ग्रुपचे मार्गदर्शक दीपक जाधव, संस्थापक शौकत शेख, अध्यक्ष अहेमद कुरेशी आदी उपस्थित होते. प्रारंभी एक तेरा साथ ग्रुपचे अध्यक्ष अहेमद कुरेशी यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत व हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. पुढे बोलताना खासदार राजेनिंबाळकर म्हणाले की, नवीन वर्षे सर्वांना सुख-समृद्धी, भरभराटीचे व शांततेचे जावो अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा व देशाच्या प्रगतीमध्ये युवकांचा वाटा सगळ्यात मोठ्या प्रमाणात असून युवकांनी देखील वेगवेगळे उद्योग उभारावेत असे आवाहन त्यांनी केले. तसेच स्वतःच्या उद्योग व्यवसायातून प्रगती करून यशस्वी होता येते. तर देशामध्ये सर्वत्र हिंदी भाषा बोलली जात आहे. मला देखील पूर्वी व्यवस्थित हिंदी बोलता येत नव्हती. मात्र मी सध्या संसदेमध्ये गठीत करण्यात आलेल्या हिंदी राजभाषेचा सदस्य म्हणून काम पाहत आहे. त्यामुळे माझी हिंदी देखील चांगली सुधारलेली असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे एखादी आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यानंतर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारची टीम आली तर पथकातील अधिकारी इंग्रजी भाषेमध्येच बोलतात. शेतकऱ्यांना इंग्रजी समजत नाही व हिंदीमध्ये देखील व्यवस्थित बोलता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हिंदी भाषा बोलण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले. जर शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची हिंदी बोलता आली तर आपल्या असणाऱ्या अडीअडचणी शासन दरबारी व्यवस्थितपणे मांडण्याबरोबरच देशाच्या इतर कुठल्याही प्रदेशात गेले तर बोलीभाषा वरून होणारी अडचण नक्कीच दूर होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे संसदेमध्ये प्रश्न मांडताना मी मराठीमध्ये प्रश्न मांडतो मात्र ट्रान्सलेटर लावून मंत्री त्यांना हवे त्या भाषेमध्ये ते समजून घेऊन ते प्रश्न सोडविण्यास मदत होत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
तर आमदार कैलास पाटील म्हणाली की, कोणत्याही समस्या असतील तर त्या समस्या माझ्याकडे लेखी स्वरूपात सांगाव्यात. रस्ता, पाणी, लाईट किंवा इतर समस्या आपण शासन दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा करून त्या निश्चितपणे सोडवून घेऊन शेतकऱ्यासह सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण करणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे अगदी निसंकोचपणे समस्या सांगाव्यात असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एक तेरा सात ग्रुप चे संस्थापक शौकत शेख यांनी तर उपस्थितांचे आभार अहेमद कुरेशी यांनी मानले. यावेळी शहरातील फिरोज पठाण, अलीम पठाण, जुबेर शेख, मगबुल टकारी,अब्रार कुरेशी, नवनाथ डोंगरे, किरण एडके, अफजल कुरेशी, अमजद शेख, खलील सौदागर, महादेव थोरात, पप्पू खुळे, शिवा शेंडगे, मिलिंद पेठे, मुजाहिद कुरेशी, फारुख शेख, अमीर सौदागर, किरण कांबळे, फकीर सौदागर, बिलाल कुरेशी, रणजीत एडके, अमजद पठाण, सिताराम शिंदे, असलम कागदी, जुबेर तांबोळी, खाजा सौदागर, बाळू बनसोडे, अमजद कुरेशी, मुस्तकीम कुरेशी,अमर गायकवाड, संघर्ष सूर्यवंशी, अनिकेत बनसोडे, बाळासाहेब कांबळे, उमर शेख आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.