तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातील प्रा. विश्वास पतंगे यांचा “अर्ली डायग्नोसिस ऑफ लंग कॅन्सर थ्रू डीप लर्निंग इव्हॅल्युएशन“ या विषयावरील शोधनिबंध जपान येथील आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषद “इंजिनिअरिंग, टेक्निकल प्रोग्रेस अँड अप्लाइड सायन्सेस 2025“ मध्ये निवडला आहे.
अशा नामांकित परिषदेस शोधनिबंधाची निवड झाल्याने महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आडेकर आर एच, उपप्राचार्य प्रा. रवी मुदकन्ना व महाविद्यालयाचे विश्वस्त सौ माया माने तहसीलदार तथा व्यवस्थापक श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तसेच अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी धाराशिव डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अभिनंदन केले आहे.