धाराशिव(प्रतिनिधी) -    धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन खरेदीची मुदत ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वाढविण्यात यावी, सोयाबीनसाठी बारदाना ताबडतोब उपलब्ध करून द्यावा व शासनाने हमीभावाने दूर खरेदी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी गुरुवारी (दि.२) पुणे येथील सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांच्याकडे केली आहे.

 अपर मुख्य सचिव यांना दिलेल्या निवेदनात श्री. दुधगावकर यांनी म्हटले आहे की, मराठवाड्यात खरिपामध्ये सोयाबीन पेरणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये ९० टक्के सोयाबीनची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामध्येच सोयाबीन काढलेली आहे. पावसाळ्यामध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीनमधील आद्रता थंड हवामानामुळे कमी होत नाही. जिल्ह्यामध्ये सोयाबीनची २० खरेदी केंद्र कार्यरत असताना गेल्या आठ दिवसापासून बारदान्याअभावी १२ खरेदी केंद्र बंद झाली आहेत. त्यासाठी त्वरित त्या खरेदी केंद्रांना बारदाना उपलब्ध करून द्यावा व सोयाबीन खरेदीची मुदत ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वाढविण्यात यावी, जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असून मागील वर्षात १२ हजार रुपये प्रति क्विंटल तूर विक्री होत असताना आजमात्र त्याचे भाव ७ हजार रुपयांवर येऊन ठेपलेले आहेत. यामुळे शेतकºयांना प्रति क्विंटल चार ते पाच हजार रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यामध्ये तूर हमीभाव केंद्र चालू करावे व शेतकºयांचे आर्थिक नुकसान टाळावे, अशी मागणी श्री. दुधगावकर यांनी या निवेदनात केली आहे.

 
Top