तुळजापूर (प्रतिनिधी) - भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या व्76 या सभारंभा दिना निमीत्त आयोजित ध्वजारोहन कार्यक्रम पञिका प्रतिवर्षा प्रमाणे यंदा संबधितांना न  पोहचल्याने  अनेकांना मुख्य  शाषकिय  ध्वजारोहन कार्यक्रमा पासुन वंचित राहावे लागले. तुळजापूर येथील तहसिल कार्यालयाने तर चक्क  जिल्हाधिकारी कार्यालयाचा कार्यक्रमाचा पञिका वाटुन वेळ निभावुन नेली. तुळजापूर  नगरपरीषद ने व्हॉट्सअपवर कार्यक्रम पाठवल्या. त्यामुळे ध्वजारोहन कार्यक्रमाचा चहापानी, पञिका, हार तुरे, शाल, श्रीफळ  पासुनचा जो खर्च येतो त्याचीच चौकशी करण्याची मागणी होत आहे.

काही कार्यालयांनी  कागदोपञी पञिका छापल्याचे दाखवुन व्हॉट्स्‌‍अपवर एक डिझिटल प्रिंट काढुन त्या व्हॉट्स्‌‍अपवर टाकल्याचे दिसुन आले. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचा खर्चाची सखोल चौकशी होणे गरजेचे बनले आहे. राष्ट्रीय कार्यक्रमातुन कमाई हा  तुळजापूर नवीन पँटर्न उदयास आला असुन यामुळे वर्षानुवर्षे स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रमाला होणारी गर्दी कमी होत चालली आहे. ऐकंदरीत भष्ट्राचार करणारी  मंडळी प्रजासत्ताक दिनाला ही सोडण्यास तयार नसल्याचे दिसुन येत आहे.

 
Top