तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी आमची कुलदैवता आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर विकासात माझा हातभार लागावा, योगदान असावे असे आईच्या मनात असल्यानेच तिच्या कृपा आशिर्वादाने माझी पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली. आईचा आशिर्वादाने तिर्थक्षेञ तुळजापूरचा व धाराशिव जिल्हयाच्या जेवढा विकास करता येईल तेवडा मी करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंञी प्रताप सरनाईक यांनी श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर मंदिरात पत्रकारांशी संवाद साधताना केले.
यावेळी पञकारांनी धाराशिव जिल्हा मागासलेला आहे. आपण कुठली कामे प्राधान्याने करणार असे विचारताच प्रथम मला धाराशिव जिल्हा तरी समजुन घेवु द्या असे म्हणताच एकच हास्य कल्लोळ उडाला. मी दोन दिवसात विविध बैठका माध्यमातून जिल्हयाची सविस्तर माहीती घेणार असुन तुमच्या मनातील विकासाची संकल्पना मी प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी ना विश्वासात घेऊन जिल्हयाचा विकास करणार असल्याचे स्पष्ट केले.
एसटी दरवाढ बाबतीत म्हणाले कि प्राधिकर बैठकीत चर्चा होवुन 14.95 टक्के दरवाढ केली आहे दरवाढ करणे अपरिहार्य होते सध्या रोज एसटीला तीन कोटी तोटा होत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एसटी महामंडळाला सतत हात पसरावे लागत आहेत. डिझेल, पेट्रोल, सीएनजी दर वाढले. 87 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारी वाढली. जेष्ट नागरिकांना मोफत प्रवास, लाडक्या बहीणीना पन्नास टक्के दर, अंध, अंपग, शालेय विध्यार्थी यांना दरात सवलत हे योजनांचा भार एसटीवर पडत आहे. शासनाने महामंडळाला सांगितले आहे कि, एसटी ने उत्पन्न स्ञोञ वाढवावे. दरवाढी मुळे प्रवाशांचे नुकसान नाही. गावोगाव एस टी पोहचावी. सर्व योजना चालु राहाव्यात. उत्पन्नात वाढ झाली पाहिजे यासाठी प्रवाशांनी ही योगदान देणे गरजचे असल्याचे म्हणाले. महायुति सरकारने चालु केलेल्या योजना बंद पडणार नाहीत अखंडीत चालु राहतील असे शेवटी म्हणाले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, शांताराम पेंदे, बापुसाहेब भोसले उपस्थितीत होते.