तुळजापूर (प्रतिनिधी) - पंजाब अमृतसर येथे महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची फोडाफाड करणाऱ्या घटनेचा निषेध करुन सदरील नराधमास फाशी देण्याच्या मागणीसाठी मंगळवार दि. 28 जानेवारी रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने तहसिल कार्यालया समोर निदर्शने करण्यात आले.

भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष म्हणजेच अमृत महोत्सव चालू असताना या देशात ही घटना  घडणे निंदणीय आहे. या घटनेच्या  निषेधार्थ कारवाईचे निवेदन देण्यात आले. रिपोई आठवले पक्षाचे  तानाजी कदम, प्रकाश कदम, अरुण कदम, आप्पा कदम, अमोल कदम, प्राध्यापक अशोक कांबळे, रवी वाघमारे , वैजनाथ पांडागळे, सचिन महादेव सोनवणे, गोपाळ सोनवणे, तानाजी डावरे, बापू सोनवणे, अतिश कदम, शहर सचिव आनंद झाले, सुरेश चौधरी, विजय गायकवाड, चंचल कदम,  युवक तालुका अध्यक्ष विष्णू सोनवणे, तुळजाराम सावंत, लखन गायकवाड, बाबा मस्के, संतोष रणदिवे, रमेश गायकवाड, हरिदास कांबळे, महादेव जेटिथोर, भास्कर पांडागळे, शरणा कदम, शिवाजी कदम, सोनवणे हिरालाल, विनोद भालेकर, गोरख कदम, बिट्टू कदम, सुरज कदम, हनुमंत सोनवणे, विनोद कदम, भागवत कदम, नारायण जाधव, निशांत कदम, नागेश कदम आदीसह असंख्य कार्यकर्ते या निदर्शनास  उपस्थित होते.

 
Top