धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील ताकविकी येथे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांची औसा ते तुळजापूर पायी नवसपूर्ती पदयात्राचे आगमन झाले असता भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा रुपामाता समूहाचे प्रमुख ॲड. व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते शॉल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. 

तदनंतर तुळजाभवानी आराधी मंडळाचा गोंधळाचा आयोजित भक्तीपर कार्यक्रमाचा आनंद घेतला.. यावेळी माजी जि प उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, बाबुराव पुजारी गुंड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत पवार, बँकेचे संचालक शंकर गाडे, रुपामाता अर्बन मल्टीस्टेट संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर, रूपामाता माझे स्टेट संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण बोधले, सोमेश्वर शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.


 
Top