धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यामध्ये सुरक्षा व सुरक्षितता या उपक्रमाचे जिल्हास्तरीय केंद्रप्रमुखांसाठी प्रशिक्षण आयोजित केलेले होते. हा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई व स्किल ट्री कन्सल्टिंग लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद संचालक आर विमला मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबवण्यात येत असून धाराशिव जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पाटील यांच्या सूचनेप्रमाणे आज प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणासाठी स्वतः शासकीय शिक्षण प्रशिक्षण संस्था प्राचार्य डॉक्टर दयानंद जटनुरे सर ,विस्तार अधिकारी डी. एम. जंगम व देवगुडे व संशोधक सहाय्यक गायकवाड सर उपस्थित होते .या प्रशिक्षणाचा शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना फायदा होईल अशी अपेक्षा शिक्षणाधिकारी  यांनी व्यक्त केली आहे.

 
Top