परंडा (प्रतिनिधी) - देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी या पक्षाचे आज भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि.2 रोजी “भाजपा सदस्य नोंदणी अभियान“ सुरू करण्यात आले.
या अभियानाच्या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य-पाटील,प्र.कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे, प्रविण पाठक, ॲड.झहीर चौधरी, जिल्हा सदस्य नोंदणी प्रमुख इंद्रजित देवकते, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, सरचिटणीस विकास कुलकर्णी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, जिल्हा मिडिया प्रमुख सचिन घोडके, तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, तालुका नोंदणी प्रमुख तानाजी पाटील, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते तसेच इतर मान्यवर पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.