तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील उपजिल्हा रुग्णालयातील उध्दट भाषा रुग्णांना करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी धनाजी कुरुंद यांनी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय यांना तक्रार अर्ज देवुन केली आहे.
तक्रार अर्जात म्हटलं आहे कि, मंगळवार दि. 21 जानेवारी रोजी माझी पत्नी उपजिल्हा रुग्णालयात आली असता रुम नंबर चार मध्ये बीपी शुगर तपासणी साठी गेली. शुगर चेक केली व शुगर चेक साठी बोटातुन रक्त काढले होते ते पुसण्यासाठी ओले केलेले कापड मागीतले असता तेथील कर्मचाऱ्याने साडीला पुस असे सांगितले. तसेच ईसीजी रुममध्ये अंगाला लावलेले लिक्विड पुसण्यासाठी कापड मागितले असता साडीने पुसा व फारच स्वछता पाळत असल्यास घरी जावुन आंधोळ अशी उध्दट भाषा तिथे असलेले टेक्निशायन कदम यांनी वापरली. सदर बाब गंभीर असुन ईसीजी टेक्नीशियन हा पुरुष असुन एखाद्या रुग्ण महिलेला उध्दट अर्वाच्य भाषा वापरत असेल तर ही बाब गंभीर आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन सदर कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करुन केलेल्या कारवाईची माहीती द्यावी अशी मागणी केली असुन या अर्जाची प्रत सिव्हील सर्जन यांना देण्यात आली आहे.