तुळजापुर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत चालु असलेल्या अवैध धंद्यामुळे या पविञ धार्मिक नगरी बदनाम होत असुन दिवसेंदिवस वाढत चाललेले अवैध धंदे, चो-यां बंद करण्यासाठी महाविकास आघाडी वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या तिर्थक्षेत्री अवैध धंदे बंद न केल्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटुन येथील अवैध धंद्याची माहिती व निवेदन देणार असल्याची माहीती महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी दिली.
महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, गेले 2-3 महिन्यापासुन चो-यांचे प्रमाण वाढले असुन दिवसा ढवळ्या घरफोडी, रस्त्यावर महिलेच्या गळ्यातील दागिणे पळवुन नेणे असे अनेक प्रचंड प्रमाणात घटना होत आहेत. सदरील तुळजापुर शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. यामुळे सर्वसामान्य जनता व येणारे भाविक हे भयभित झाले आहेत. या प्रकरणावरती आपणाकडुन कुठलीही ठोस कारवाई झालेली दिसुन येत नाही. विशेषतः शहरातील सर्वच बाजुच्या बाहेरील भागात विशेषतः चो-यांचे प्रकार व शस्त्रांचे धाक दाखवुन घरफोडी केली जात आहे. तुळजापुर शहरात प्रत्येक चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरा असुनही आपण दुर्लक्ष करत आहात याची खंत वाटते. तुळजापुर शहर हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची पावन नगरी आहे. त्याठिकाणी अशा चो-यांचे व दरोड्यांच्या घटनेमुळे तुळजापुर शहराचे नाव बदनाम होत आहे. तसेच तुळजापुर शहरात गेल्या महिन्यापासुन घरफोडी, रस्त्यावर लुट, महिलांच्या गळ्यातील दागिणे हिसकावुन घेणे, शस्त्र दाखवुन लुटणे अशा घटना घडत आहेत. तसेच तुळजापुर शहरात अवैध धंदे, ड्रग नशेली पदार्थांची विक्री होत असुन त्यामुळे गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडत आहेत. वरचेवर ड्रग्स नशेली पदार्थांची वाढ होत आहे. यामुळे शहरातील नागरिक व येणारे भक्त हैराण झाले आहेत.
तरी निवेदनाचा विचार करुन तुळजापुर मध्ये येणारे लाखो भाविकांना व तुळजापुर शहरातील नागरिकांवर होत असलेल्या अन्याय दुर करुन सुविधा तात्काळ चालु करण्यात याव्या हि विनंती. नसता नाविलाजास्तव तुळजापुर महाविकास आघाडी व सर्व घटक पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असे निवेदन अमोल कुतवळ, अमर मगर, शाम पवार, भाऊ भांजी, अक्षय कदम ,नरेश पेंदे,भरत जाधव,नवनाथ जगताप, बबन गावडे,सुधीर कदम, शंतनु कुतवळ, बाळासाहेब मुळे, अभिमान सगट, विकास भोसले, बापूसाहेब नाईकवाडी, सुदर्शन वाघमारे, चंद्रकांत साळुंखे या विकास महाआघाडी पदाधिकाऱ्यांनी दिले.